हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) ही भारताची शान आहे. प्रवासाला अंत्यंत आरामदायी असल्याने वंदे भारत ट्रेन ही प्रत्येकाच्या पसंतीस पडत आहे. सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे रेल्वेने अनेक गाड्या सोडल्या. आता सुट्ट्या संपत आल्या असून लोक परतीचा मार्ग पकडत आहेत. त्यामुळे आताही गर्दी वाढण्याची शक्यता आहे. हा विचार करून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन रात्रीच्या वेळी प्रवाश्यांना सेवा देणार आहे. त्यासाठी तामिळनाडूच्या चेन्नई शहरापासून कर्नाटकातील बेंगळुरू शहरापर्यंत विशेष वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात आली.
21 नोव्हेंबरला चालवण्यात आली गाडी
21 नोव्हेंबर रोजी चेन्नई ते बेगळूरू शहरापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चालवली होती. ती रात्री 11 वाजता चेन्नईहुन निघाली तर सकाळी 4:30 वाजता ही गाडी बेगळूरूला पोहोचली. या गाडीत एकूण आठ डब्बे आहेत. त्यामुळे येथील प्रवश्यांना प्रवासासाठी दिलासा मिळाला आहे.
कसे आहे वेळापत्रक? Vande Bharat Express
सणासुदीच्या तोंडावर चालवलेली ही सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन प्रवाश्यांना रात्रीची सेवा प्रदान करणार आहे. त्यामुळे दक्षिण रेल्वेने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार ही गाडी चेन्नई आणि कर्नाटक या दोन प्रमुख महानगरांदरम्यानचा प्रवासाचा कालावधी हा केवळ 5:30 तासात पूर्ण करते. त्यामुळे प्रवाश्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. ही गाडी बुधवारी सकाळी चेन्नई सेंट्रल स्टेशनवरून निघेल आणि कर्नाटक राजधानीतील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलला पोहचेल.
रात्रीच्या वेळी दोन महानगरांदरम्यान प्रवाशांसाठी वंदे भारत स्पेशल ट्रेन सोडली जाणार – रेल्वे अधिकारी
रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्रेनबद्दल बोलताना माध्यमांना सांगितले की, रात्रीच्या वेळी दोन महानगरांदरम्यान प्रवाशांसाठी वंदे भारत स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक ठेवण्यात आले आहे. तरी प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता आगामी सुट्ट्यामध्ये रात्री अधिक विशेष गाड्या सोडल्या जातील असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवश्यांना दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर मध्ये सुरु करण्यात आली होती वंदे भारत ट्रेन
चेन्नई या मार्गावर प्रवाश्यांच्या सोयीसाठी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्यामुळे सध्या सुरु केलेली वंदे भारत आणि मागच्या वर्षी सुरु केलेली वंदे भारत अश्या मिळून दोन वंदे भारत ट्रेन या मार्गावर सध्या धावताना दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील ही रात्रभर चालणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सेवा असेल.
किती आहे तिकीट?
प्रत्येक ट्रेनमध्ये सामान्य लोकांपासून ते मोठ्या लोकांसाठी इकॉनॉमी आणि हायक्लासचा विचार केला जातो. त्यासाठी रेल्वेचे वेगवेगळे डब्बे देखील असतात. तसेच वंदे भारतमधील चेन्नई-म्हैसूर मार्गावरील इकॉनॉमी क्लासच्या तिकिटाची किंमत ही 921 रुपये एवढी आहे. तर एक्झिक्युटिव्ह क्लासच्या तिकिटाची किंमत ही 1880 रुपये एवढी आहे. वास्तविक, दिवसभरात सर्व वंदे भारत ट्रेन चालवण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाश्यांना याचा दिलासा मिळणार आहे. आणि त्यांचा प्रवासही सुखकर होईल.