हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) ही चांगलीच चर्चेत आहे. प्रत्येक नागरिकांच्या तोंडात वंदे भारत ट्रेनचा नारा गुंजतो आहे. मात्र आता त्याच नागरिकांनी वंदे भारत ट्रेनच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आणि ह्या तक्रारीमुळे वंदे भारत ट्रेनमध्ये नागरिकांना दिली जाणारी सेवा एक सेवा बंद करण्यात आली आहे. येत्या 6 महिन्यांपर्यंत वंदे भारतमध्ये (Vande Bharat Train) पाकिटबंद जेवण देण्यात येणार नाही. यामागे नेमकं काय कारण आहे हे आज आपण जाणून घेऊयात.
वंदे भारत मध्ये (Vande Bharat Express) नागरिकांना प्रवासात गरम जेवण भेटावे यासाठी पॅकबंद जेवण दिले जायचे. त्यासाठी प्रवासी आधी बुकिंगही करून ठेवायचे. मात्र प्रवाश्यांनी ह्याबाबत तक्रार केल्यामुळे रेल्वेने परिपत्रक काढत ही सेवा सहा महिन्यांसाठी बंद केली आहे.पॅकेटबंद जेवण, बेकरी प्रोडक्ट, वेफर्स, कन्फेक्शरी आयटम, कोल्ड ड्रिंक्स आणि अलाकार्टे इत्यादीबाबत प्रवाश्यांकडून वारंवार तक्रारी होत होत होत्या. एवढेच नव्हे तर खाद्यपदार्थ्यांचे डब्बे ट्रेनच्या दरवाजाजवळ ठेवत असल्यामुळे त्याचा होणारा आवाज आणि त्यामुळे उघडे राहणारे दार ह्यामुळे प्रवाश्यांना त्रास व अडचण होत होती. याबाबत तक्रार केल्यानंतर त्वरित रेल्वेने निर्णय घेत निर्णयावर शिक्कामोर्तब केला.
शाकाहारी जेवण मागवल्यावर मांसाहारी जेवण ट्रेनमध्ये दिले जायचे-
जेवणाबाबतच्या तक्रारी बद्दल तक्रारीत असेही सांगण्यात आले आहे की, प्रवाशी शाकाहारी जेवण मागवत असतील तर त्यांना मांसाहारी जेवण दिले जायचे. त्यामुळे नवीन निर्देश दिल्यानंतर ह्यामध्ये नक्कीच फरक पडेल.
थंड पाणी आणि गरम जेवण मिळण्यासाठी रेल्वे करणार घोषणा-Vande Bharat Express
प्रवाश्यांच्या तक्रारीमुळे वंदे भारत (Vande Bharat Express) चांगलीच कामाला लागली आहे. पॅकेटबंद जेवणाबाबरोबरच रेल्वे प्लॅटफॉर्मवर थंड पाण्याच्या बाटल्या आणि गरम जेवण देण्यासाठी स्थानकाच्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर पॅन्ट्रीसेवा दिली जाईल. त्यासाठी तशी घोषणा केली जाईल. असे प्रतिपादन रेल्वेकडून करण्यात आले आहे.