Vande Bharat Express | पुणे म्हंटल की आठवत ते शिक्षणाचे माहेरघर. त्यातच पुण्यामध्ये मेट्रो सुरु झाल्यामुळे पुणे करांसाठी वाहतूक सुविधा ही वाढली आहे. असे असताना आता पुण्यामध्ये आता २ वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहे. त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडीस आळा घातला जाईल. आता या वंदे भारत एक्सप्रेसचा रूट नेमका कसा असेल याबाबत जाऊन घेऊयात.
पुण्याला मिळालीये आधीच वंदे भारत ट्रेन- Vande Bharat Express
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर ही एकमेव वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सध्याच्या घडीला गाडी पुण्यामार्गे धावत आहे. त्यामुळे पुण्याला आधीच वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे. परंतु असे जरी असले तरी सुद्धा पुण्यावरून थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरु नाहीये. त्यामुळे पुणेकरांना अजून एक वंदे भारत ट्रेन भेट दिली जाणार आहे. ती देखील थेट पुणे रेल्वे स्थानकावरून
मध्य रेल्वेने मांडला प्रस्ताव
मध्य रेल्वेने पुण्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरु करण्यासाठी पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते शेगाव या दोन मार्गांसाठी मध्य रेल्वेने प्रस्ताव मांडला आहे. परंतु अद्याप रेल्वे बोर्डाने यावर मंजुरी दिली नाही. मात्र लवकरच ही ट्रेन पुण्यात सुरु होणार आहे. पुण्याहून शेगावला जाणाऱ्या भाविकांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे या मार्गांवरही वंदे भारत चालवण्याचा प्लॅन आहे.
शताब्दी एक्सप्रेस होणार बंद
पुणे ते सिकंदराबाद दरम्यान सध्या शताब्दी एक्सप्रेस सुरू आहे. परंतु ही एक्सप्रेस बंद करून त्याजागी वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या ठिकाणच्या प्रवाश्यांचा प्रवास हा जलद गतीने होणार आहे.