हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vande Bharat Metro : या वर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी भरभरून निधी देण्यात आला आहे. आता शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेतला गेला आहे. ज्याअंतर्गत वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवरच शहरांमध्ये वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरु केली जाणार आहे. मात्र ही वंदेभारत मेट्रो सामान्य वंदेभारत ट्रेनपेक्षा जरा वेगळी असेल. हे जाणून घ्या कि, या वंदे भारत मेट्रो फक्त मोठ्या शहरांमध्येच सुरु केल्या जातील.
याबाबत माहिती देताना रेल्वे मंत्री असलेल्या अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की,”वंदे भारत ट्रेन पूर्णपणे यशस्वी झाली आहे. लोकांना ती खूप आवडली देखील आहे. ज्यामुळे आतापर्यंत 40 लाखांहून जास्त प्रवाशांनी सर्व वंदे भारत ट्रेनने प्रवास केला आहे.” आपली वंदे भारत ट्रेन परदेशातीळ ट्रेनपेक्षाही चांगली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हे लक्षात घेऊनच आता शहरांमध्ये देखील Vande Bharat Metro धावणार आहे. सध्या त्याचे डिझाईन आणि चाचणीचे काम सुरू झाले आहे.
सामान्य वंदे भारत आणि वंदे भारत मेट्रोमधील फरक
सध्याच्या वंदे भारत ट्रेनला शून्यावरून 100 चा वेग पकडण्यासाठी 52 सेकंदांचा कालावधी लागतो, मात्र Vande Bharat Metro अशा प्रकारे डिझाईन करण्यात आली आहे की, ती 45 ते 47 सेकंदात शून्यावरून 100 चा वेग पकडू शकते. मात्र त्याचा वेग हा सामान्य वंदे भारत ट्रेनपेक्षा कमी ठेवला जाईल. हे जाणून घ्या कि, सामान्य वंदे भारतचा वेग 180 किमी प्रति तास आहे मात्र त्याचा वेग 120 ते 130 किमी प्रति तास ठेवण्यात येईल. Vande Bharat Metro ची स्थानके जवळच असल्याने याचा वेग जास्त ठेवण्याची गरज नाही. याशिवाय लोकल धावणार त्यामध्ये शौचालयाची गरज भासणार नाही. ज्यामुळे त्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त जागा देखील उपलब्ध असेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://indianrailways.gov.in/railwayboard/uploads/directorate/coaching/TAG_2019-20/Vande_Tejas_Uday_Gatiman_Exp.pdf
हे पण वाचा :
Railway Budget 2023 : रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचे बजट, 2013 च्या अर्थसंकल्पापेक्षा 9 पटींनी जास्त
Share Market : अर्थसंकल्पाचा विमा कंपन्यांना फटका, शेअर्समध्ये झाली 14 टक्क्यांपर्यंतची घसरण
Budget 2023 : आता PF मधून पैसे काढल्यावर द्यावा लागणार कमी TDS, जाणून घ्या कोणाला होणार फायदा
Post Office च्या ‘या’ योजनेमधील डिपॉझिटच्या लिमिटमध्ये झाली वाढ !!!
New Tax Slab vs Old Tax Slab : जुन्या अन् नवीन स्लॅबमध्ये काय फरक आहे??? किती उत्पन्नावर किती टॅक्स द्यावा लागेल ते पहा