Vande Metro 2024 मध्ये धावणार; ट्रेनमध्ये मिळणार ‘या’ खास सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकलचा कायापालट करण्याचा निर्धार रेल्वे विभागाने केला आहे. त्यासाठी EMU तंत्रज्ञानावर आधारित वंदे मेट्रो मुंबई लोकलच्या जुन्या रॅकची जागा घेतील असे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. आता मात्र वंदे मेट्रो (Vande Metro) बाबत नवीन बातमी समोर आली आहे. वंदे मेट्रो 2024 ला आपल्याला रुळावर धावताना दिसणार आहे. तसेच यामध्ये प्रवाशांसाठी अनेक सुखसोयी सुविधा आणण्यात येणार आहे.

सुरुवातीला मुंबई लोकलमध्ये वंदे मेट्रो आणण्यात येतील याबद्दल देशाचे रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली होती. वंदे मेट्रो 130 किमी प्रतितास वेगाने जाणाऱ्या छोट्या प्रवासासाठी जलद, वातानुकूलित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) चे महाव्यवस्थापक बीजी मल्ल्या यांनी या प्रकल्पाबद्दल अधिक स्पष्ट केले की वंदे मेट्रो ट्रेन 300 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासाच्या अंतरासाठी तयार केल्या आहेत.वंदे मेट्रो कार्यक्षम आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करून प्रत्येक कोचमध्ये 100 प्रवाशी आसनांवर आणि अतिरिक्त 200 उभे राहून बसू शकतात.

वंदे मेट्रो काय असतील खास सुविधा :

सुरक्षे संदर्भातील सुविधा : वंदे मेट्रोमध्ये आग लागल्यावर तात्काळ माहिती कळण्यासाठी अलार्म बसवण्यात आले आहेत.तसेच ऑटोमॅटिक दरवाजे बसवण्यात येणार आहेत व आपत्कालीन talk back unit बसवण्यात आले आहेत.

कवच सुविधा : वंदे मेट्रोत भारताने विकसित केलेले कवच सिस्टिम बसवलेले आहे. त्यामुळे अपघात टळतील.

टॉयलेट सुविधा : वंदे मेट्रो मध्ये vaccum evacuation system तंत्रज्ञानावर आधारित नवीन पद्धतीचे टॉयलेट बनवलेले आहेत. स्वच्छतेची पुर्ण काळजी घेतली जाणार आहेत.

सामान ठेवण्याची जागा : वंदे मेट्रो मध्ये प्रवाश्यांना सामान ठेवण्यासाठी विशेष जागा देण्यात आली आहे. त्यासाठी रॅक बनवण्यात आले आहेत.

पॅनारोमिक खिडक्या : वंदे मेट्रोमध्ये प्रवाश्यांना प्रवासाचा चांगला अनुभव देण्यासाठी पॅनारोमिक खिडक्या बसवण्यात येणार आहेत.

आधुनिक सुविधा : वंदे मेट्रोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, एलसीडी डिस्प्लेसह पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम (पीआयएस), डिफ्यूज्ड लाइटिंग आणि रूट इंडिकेटर डिस्प्ले यांचा समावेश आहे.