भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेल्या कवी वरवरा राव यांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एल्गार परिषद प्रकरणात आरोपी असणारे कवी आणि ऍक्टिव्हिस्ट वरवरा राव यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. ८१ वर्षीय राव यांनी त्यांच्या बिघडलेल्या वैद्यकीय स्थितीमुळे आणि सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे तात्पुरता जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतमागणी केली होती.  पण त्यांचा जामीन फेटाळला गेला होता.

राव यांच्यासोबत आणखी एक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे आणि इतर आठ कार्यकर्त्यांना एल्गार परिषद-माओवाद्यांच्या दुवा प्रकरणात अटक करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाची चौकशी केली आणि नंतर जानेवारीत ते प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपविण्यात आले.

हा खटला ३१ डिसेंबर, २०१७ रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत झालेल्या कथित प्रक्षोभक भाषणाशी संबंधित आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, दुसर्‍याच दिवशी पश्चिम महाराष्ट्र शहराच्या बाहेरील कोरेगाव-भीमा युद्ध स्मारकाजवळ हिंसाचार झाला होता.

हे पण वाचा –

.. म्हणून धनंजय मुंडेंनी बारामती गाठतं शरद पवारांची घेतली भेट 

B’day : तुम्हाला कतरिना कैफचे खरे नाव माहित आहे? चला तर पाहूया कॅट च खरं नाव

मुंबईतल्या मालाडमध्ये इमारत कोसळली, मदत आणि बचावकार्य सुरु

आदित्य ठाकरेंचा उल्लेख का होतोय बेबी पेंग्विन ? काय आहे प्रकरण?

आता घर बसल्या Activate करा SBI चे नेट बँकिंग ! कसे ते जाणून घ्या

Leave a Comment