अमिताभ बच्चन यांनी विठोबा-रखुमाईला घातलं साकडं; जाणून घ्या काय आहे ‘हे’ प्रकरण 

मुंबई । महानायक अमिताभ बच्चन यांना शनिवारी कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अमिताभ बच्चन जरी रुग्णालयात दाखल असले तरी सोशल मीडियावर ते सक्रिय आहेत. इन्स्टाग्राम, ट्विटरवर ते रोज पोस्ट लिहित आहेत. नुकताच त्यांनी एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत विठोबा-रखुमाईला साकडं घातलं आहे. ‘ईश्वर के चरणों में समर्पित’, असं कॅप्शन लिहित त्यांनी विठ्ठल-रखुमाईचा फोटो पोस्ट केला आहे.

११ जुलै रोजी अमिताभ बच्चन व त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मुंबईतील नानावटी रुग्णालयांना त्यांना दाखल करण्यात आलं. नानावटी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू असून पुढील ७ दिवस तरी त्यांना रुग्णालयातच राहावं लागणार आहे. “दोघांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांना किमान आणखी ७ दिवस तरी रुग्णालयात राहावं लागणार आहे”, अशी माहिती रुग्णालयाने दिली होती. तर ऐश्वर्या राय बच्चन व ८ वर्षीय आराध्या यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

 बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे मुंबई महापालिकेने रविवारी ‘जलसा’, ‘प्रतीक्षा’, ‘जनक’ आणि ‘वत्सा’ हे त्यांचे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून लॉकडाऊन केले. चारही बंगले र्निजतुक करण्यात आले असून पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी चारही बंगल्यांतील सुमारे ३० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे गेल्या १४ दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध पालिकेने सुरू केला आहे. दरम्यान, जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नवेली, अगस्त नंदा यांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे समजते.

हे पण वाचा –

अजबगजब ! सावत्र मुलापासून गेले दिवस, केले त्याच्याशीच लग्न

धक्कादायक ! रुग्णालयातील मोफत wifi वापरून रूग्णाने डाउनलोड केले तब्ब्ल 80 हजार अश्लील व्हिडीओ

आदित्य ठाकरेंचा उल्लेख का होतोय बेबी पेंग्विन ? काय आहे प्रकरण?

VIDEO: चक्क लहान मुलाप्रमाणे पावसात भिजण्याचा सचिनने लुटला मनमुराद आनंद

सुशांत सिगच्या आत्महत्येला वेगळं वळण; रिया चक्रवर्तीची अडचण वाढली