व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

…तर तुमचा पराभव निश्चित; वसंत मोरेंचा शिंदे- फडणवीसांना इशारा? फेसबुक पोस्ट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली तरी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे शिंदे फडणवीस सरकारला थेट इशारा दिला आहे. वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे सरकारसोबत सकारात्मक असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा कोंडी होण्याची शक्यता आहे.

वसंत मोरे यांची पोस्ट नेमकी काय?

माझा शिंदे + फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे २ आमदार नुकतेच मयत झाले. आजुन त्यांच्या सरणाची राख निवली सुद्धा नसेल, तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या, मग मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे… विकास कामे ठप्प झाली आहेत निधी नसल्यामळे नागरिकांना थोबाड दाखवू वाटत नाही.

पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे आणि हो जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार असं म्हणत वसंत मोरे यांनी थेट शिंदे फडणवीसांना इशारा दिला आहे. एकीकडे मनसेची आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकारची जवळीक वाढली असताना वसंत मोरे यांच्या पोस्टने चर्चाना उधाण आलं आहे.