पुणे लोकसभेसाठी वसंत मोरेंचे नाव? ‘त्या’ पोस्टने चर्चाना उधाण

vasant more
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातून लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून कोणत्या जागेवर कोणाला तिकीट दयायचे याची चाचपणी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. तत्पूर्वी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या अकाली निधनाने पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा लागू शकते. या सर्व चर्चा सुरु असतानाच आता मनसेकडून वसंत मोरे याना खासदारकीचे तिकीट मिळणार अशी शक्यता निर्माण झालेय. याच कारण ठरतंय वसंत मोरे यांनी केलेली फेसबुक पोस्ट ….

वसंत मोरे नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते नेहमीच काही ना काही पोस्ट करून आपलं परखड मत मांडत असतात. आता त्यांनी अशीच एक पोस्ट करत सस्पेंस वाढवला आहे. वसंत मोरे यांनी आपल्या गाडीचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘ऑडी जुनीच आहे फक्त कलर नवीन केलाय, नाहीतर खासदारकीला नाव आलंय, उगाच गैरसमजाने गाडी पाहून ईडी वाले यायचे घरी.. असं म्हणत त्यांनी एकीकडे ईडीला टोला लगावला आहे तर दुसरीकडे खासदारकीला उभं राहणार असल्याचे स्पष्ट संकेत सुद्धा दिले आहेत.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0cgbA1apBKPpF2wEKzttjbabPdKDUzYzYH5gQth8y6MYmbpcCBPxt5Gz8vYQdDvtCl&id=100044231363898&mibextid=Nif5oz

वसंत मोरे यांच्या या पोस्टला नेटकऱ्यानी जोरदार प्रतिसाद दिला आहे. एका चाहत्याने कमेंट केली आहे की, तात्या तुम्ही नक्कीच खासदार होणार, तर दुसरा एक चाहता म्हणतो आता कोणीही येउदे, तात्यांचा विषयच भारी, लोकांच्या मनातील खासदार फक्त तात्याचं… तर आणखी एका समर्थकाने विजयी भव असं म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एकूणच वसंत मोरे यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.