Thursday, February 2, 2023

वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी सुरू; वाढीव शुल्कामुळे खिशाला बसणार चाप

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला वासोटा किल्ला आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. पावसाळ्यात हा किल्ला पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला होता मात्र आता हा किल्ला पर्यटकांना फिरण्यासाठी सुरु करण्यात येणार आहे. येथे असलेली स्वयंभू तीर्थक्षेत्र नागेश्वर,चक्रदेव, पर्वत ही ट्रेकिंगची पर्यटन स्थळे पर्यटकांना खुली होणार आहेत. मात्र पर्यटकांना येथे फिरण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालयाकडून वाढीव प्रवेश शुल्क आकारणी केली जाणार आहे.

वाढीव शुल्काप्रमाणे 12 वर्षावरील प्रतिव्यक्तिंना 100 रुपये आणि 12 वर्षाच्या आतील व्यक्तींना 50 रुपये दर आकारला जाणार आहे. गाईड शुल्क 250 आणि बोट,वाहन 150 रुपये राहणार आहे. डीएसएलआर लेन्स कॅमेरा शुल्क 50 वरून 100 करण्यात आले आहे. सध्या मोबाईल पॉईंट शूट कॅमेऱ्यास पूर्वी शुल्क आकारले जात नव्हते मात्र आता त्यासाठी सुद्धा 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव शुल्क आकारणी 16 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे.

- Advertisement -

वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न मानले जाते. किल्ल्यावर शंकराचे एक प्राचीन मंदिर, हनुमान मंदिर, जुन्या वाड्याच्या पायाचे भक्कम अवशेष व बुरुज आढळतात.परिसरातील आणि जिल्ह्याबाहेरील अनेक पर्यटक याठिकाणी भेट देत असतात.