धक्कादायक ! वटपोर्णिमेदिवशीच पतीकडून पत्नीची हत्या,मुलीचाही कान कापला

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अक्कलकोट : हॅलो महाराष्ट्र – अक्कलकोट या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. वटपोर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिला आपल्याला ‘हाच पती जन्मोजन्मी मिळावा’ यासाठी वडाची पूजा करत असते. पण अक्कलकोट या ठिकाणी आरोपी पतीने दारूच्या नशेत पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली आहे. तसेच त्याने आपल्या मुलीचा कानसुद्धा कापला आहे. यामध्ये जखमी झालेल्या महिलेला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

या आरोपी पतीचे नाव संभाजी विष्णू पाटोळे आहे. तो वागदरी या ठिकाणचा रहिवाशी आहे. आरोपी पाटोळे काल आपल्या तीन लहान मुली आणि पत्नी पूनम हिला दुचाकीवर घेऊन वागदरीमार्गे अक्कोलकोटकडे येत होता. या दरम्यान त्याने वाटेत दुचाकी थांबवली. यानंतर त्याने एका दर्ग्यामागे नेऊन पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. यादरम्यान पत्नी मदतीसाठी याचना करत होती. मात्र पती तिच्यावर वार करत राहिला.

हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने आपल्या पोटच्या मुलीवरही हल्ला केला. त्याने आपल्या लहान मुलाचा कान कापला आहे. आरोपी पतीने हा हल्ला नेमका कोणत्या कारणासाठी केला? हे अजून समजू शकले नाही. आरोपीने दारुच्या नशेत हे संतापजनक कृत्य केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.