भारतीय महिला क्रिकेटपटूचा सुपरडान्स सोशल मीडियावर व्हायरल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मैदानावर एखादा सामना जिंकल्यानंतर जल्लोष करताना खेळाडू डान्स करत असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. क्रिकेटच्या मैदानावर वेस्ट इंडिजचे खेळाडू असा डान्स करतात. भारतीय संघात देखील युवराज सिंग, हरभजन सिंग, विराट कोहली आणि शिखर धवन हे डान्स करताना तुम्ही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर एका भारतीय महिला क्रिकेटपटूचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

https://www.instagram.com/p/B-0Id4FJQw9/?utm_source=ig_web_copy_link

ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताची क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचे डान्स हिट झाला होता. आता भारतीय संघातील खेळाडू वेदा कृष्णमूर्तीचा डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. वेदा कृष्णमूर्तीने तिच्या डान्सचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने, लॉकडाऊन मूव्ह्ज असे असू शकतात, असे म्हटले आहे.

या व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर वेदाच्या डान्सचे सर्व जण कौतुक करत आहेत. देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व खेळाडू घरातून चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संपर्क करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

 

Leave a Comment