अबब!!! १९ वर्षाच्या तरुणीचा २९ हजार किमी सायकलप्रवास

Vadangi Kulkarni
Vadangi Kulkarni
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सायकलवेडे | गडकिल्ले फिरणार्या, ट्रेकिंग करणार्यां तरुणाईबद्दल तुम्ही आजवर अनेकदा एकलं असेल. परंतू फक्त १९ वर्ष वयाच्या तरुणीने २९ हजार कि.मी. चा सायकल प्रवास केल्याचं तुमच्या कानावर आलं नसेल. होय, भारतीयांची मान उंच करणारा एक विक्रम डोंबिवलीकर मुलीने केला आहे. वेदांगी कुलकर्णी असं त्या मुलीचं नाव आहे. मूळची डोंबवलीची असलेली आणि सध्या यु.के. मधे शिक्षण घेत असलेली वेदांगी कुलकर्णी या तरुणीने सायकलद्वारे २९ हजार किमी. चा पल्ला सायकलवरुन पार केल्याने तिचं कौतुक होताना दिसत आहे.

अनेक आव्हानांचा सामना करत वेदांगीने हा प्रवास पुर्ण केला आहे. प्रवासाला सुरवात करण्याअगोदर तिने काही सायकलपटूंकडून योग्य ते मार्गदर्शन घेतल्याचं तिनं एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या प्रवासात तिला चांगले व वाईट लोकही मिळाले काहींनी तिला जेवण व चहा ही दिला. काही हवे असल्यास थांबून ती सुपरमार्केट मधून खरेदी करत असे. स्वखर्चाबाबत सांगताना ती म्हणाली की ” फक्त स्वतः साठी केलं असत तर खूप कमी खर्च आला असता. ती एका कॅनेडियन फिल्म साठी काम करत असून त्याचा खर्च 66 लाखापर्यंत येतो.

युके मधून खूप मदत मिळाली परंतू भारतामधून स्पॉन्सर नाही याची खेद वेदांगीने बोलताना व्यक्त केली. ‘मी फक्त आईबाबांची मुलगी नाही तर देशाची मुलगी आहे’ असेही ती म्हणाली. तिला आवडलेले देश कॅनडा व रशिया हे आहेत. तिथली सौंदर्यसृष्टी आणि तेथील नियम हे तिला आवडले.