कोणत्याही वाहनाच्या मालकाचे नाव कसं शोधायचं? पहा ‘ही’ सोप्पी प्रोसेस

Vehicle Owner Name
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आधुनिक जगात जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीची माहिती आपल्याला सोशल मीडियाद्वारे मिळवून जाते. त्याचप्रमाणे कोणत्याही गाडीच्या मालकाचीही माहिती मिळवता येते. परंतु ही माहिती नेहमीच ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होईल असे नसते. त्यासाठी वेगळ्या सुविधा उपलब्ध असतात. मात्र या पद्धतीमध्ये वेळ अधिक वाया जाण्याची शक्यता असते. अनेकदा अपघाताच्या ठिकाणी गाडी मालकाचे नाव शोधताना एवढा वेळ मिळत नाही त्यामुळे काही ऍप तसेच वेबसाईटचा वापर करून गाडीच्या मालकाची माहिती तुम्ही मिळवू शकता. कसे ते आज आम्ही सांगतो.

ऍपद्वारे मिळवता येते माहिती

कोणत्याही गाडीच्या मालकाची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला ‘mParivahan’ हे ऍप डाउनलोड करावे लागणार आहे. हे ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला Sign In चा पर्याय येतो. तेथे साईनइन केल्यानंतर तुम्हाला सर्च बार मध्ये गाडीचा क्रमांक टाकावा लागणार आहे. तो टाकल्यानंतर तुम्हाला गाडीच्या मालकासह गाडीची संपूर्ण माहिती मिळून जाते.

वेबसाईटवरून मिळवता येते माहिती

तंत्रज्ञानाच्या युगात गूगल आणि वेबसाईटचा वापर करून कोणतीही माहिती मिळवता येते. त्याचप्रमाणे गाडीच्या मालकाची माहिती मिळवण्यासाठी uhttps://vahaninfos.com/vehicle- details-by-number-plate या वेबसाईटचा वापर करून तुम्ही गाडीच्या मालकाची माहिती मिळवू शकता. त्यासाठी दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तिथे बॉक्स मध्ये गाडीचा क्रमांक टाकून तुम्हाला मालक आणि गाडीची संपूर्ण माहिती मिळते.

मेसेज द्वारे मिळते माहिती

बऱ्याचवेळा अपघात होतात. त्यामध्ये वाहन मालकाची माहिती मिळवणे गरजेचे असते. अश्यावेळी एसएमएसवरदेखील गाडीच्या मालकाची तसेच गाडीची माहिती मिळते. त्यासाठी तुम्हाला त्या गाडीचा क्रमांक माहिती असणे आवश्यक आहे. गाडीचा क्रमांक हा मेसेज मध्ये टाईप करून त्याआधी VHANA असे टाकावे लागणार आहे. जसं की, VAHAN mp 02 TA 1**2 असा टाकून टेक्स्ट प्लेसवर ही माहिती भरल्यानंतर ती 7738299899 या क्रमांकावर सेंड केल्यानंतर तुम्हाला लगेचच त्या गाडीच्या मालकाबद्दल आणि गाडीबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकते.

parivahan.gov.in वर जावून मिळते माहिती

गाडीच्या मालकाची माहिती ही ऑफलाईन पद्धतीनेही मिळवता येते. त्यासाठी वाहणाच्या विमा कंपनीशी संपर्क साधावा लागतो. परंतु यामध्ये वेळ वाया जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यासाठी तुम्ही परिवहन विभागाच्या वेबसाइटवर (parivahan.gov.in) जावून गाडीचा क्रमांक त्यावरती टाकून  संपूर्ण माहिती मिळवू शकता. या पद्धती अपघाताच्यावेळी ओळख पटवून देण्यासाठी सोप्या आणि अधिक फायद्याच्या ठरु शकतात. त्यासाठी ही माहिती असणे आवश्यक आहे.