Thursday, March 30, 2023

‘विभूती नारायण’ उर्फ ​​आसिफ शेखने टीव्हीच्या दुनियेत रचला इतिहास, नोंदवला ‘हा’ मोठा विक्रम

- Advertisement -

नवी दिल्ली । विभूती नारायण मिश्रा म्हणजेच ‘भाभी जी घर पर हैं’ या विनोदी मालिकेतील अभिनेता आसिफ शेखने टीव्हीच्या जगात एक इतिहास रचला आहे. होय, आपल्या चमकदार अभिनयाने लोकांचे मनोरंजन करणाऱ्या आसिफ शेखने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तो टीव्ही जगतातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे.

आसिफ शेखला ‘भाभी जी घर पर हैं’ मध्ये 300 विविध पात्र साकारल्याबद्दल ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ ही पदवी बहाल करण्यात आली आहे. आसिफ शेखने स्वतः त्याच्या इन्स्टा पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

आसिफने पोस्ट करताच लोकांनी त्याचे इन्स्टावर अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर लोकं सतत कमेंट करून त्याचे कौतुक करत आहेत. आसिफ गेल्या 6 वर्षांपासून सतत या शोशी जोडला गेला आहे आणि चाहत्यांना हसवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, त्याने आजपर्यंत सुमारे 125 चित्रपटांमध्ये काम केले आहे, मात्र त्याला खऱ्या अर्थाने ओळख दिली ती छोट्या पडद्याने. टीव्हीवर अनेक वर्षांपासून लोकांना हसवणारी ‘भाभीजी घर पर हैं’ ही टीव्ही मालिका लोकांना खूप आवडली आहे, केवळ विभूती नारायण मिश्राच नाही तर शोमधील प्रत्येक पात्र भन्नाट आहे. प्रत्येक पात्रामुळे हा शो सुपरहिट झाला असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.