नगर दक्षिणमध्ये भाजप विजयी होण्याचा आमदार कर्डिलेंनी केला विश्वास व्यक्त

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राहुरी प्रतिनिधी |महाराष्ट्रात गाजलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी आज मंगळवारी मतदान पार पडले. या मध्ये राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावत भाजपचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला.

राहुरी मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी बुरा नगर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. शिवाजी कर्डिले हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे सासरे असल्याने त्यांच्या भूमिकेकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांमुळे भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत येईल आणि नगर दक्षिण मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास कर्डीले यांनी यावेळी व्यक्त केला.

निवडणुकीच्या आधीच आपण मुख्यमंत्र्यांना भाजपचे एकनिष्ठेने काम करणार असल्याचा शब्द दिला होता. तो मी शेवट पर्यत पाळला  तसेच लोकांपर्यंत  मोदी सरकारची कामे आम्ही घेवून गेलो आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे नगर दक्षिण मधून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील हे विजयी होतील असे आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले आहेत.