नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक आईला वाटते आपल्या मुलाने खूप शिकावे आणि चांगल्या वळणावर जावे. यासाठी कधी कधी आई आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उपवास, पूजासह नवसही मागते. आपल्या मुलाला थोडा जरी त्रास झाला तरी तिला सहन होत नाही. मात्र जर आपल्या मुलाला लहान वयात कोणते व्यसन लागले तर ती आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आपल्या सगळ्या मर्यादा ओलांडते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एका आईने नशेच व्यसन लागलेल्या आपल्या मुलाला भयंकर शिक्षा दिली आहे.
What happened when a mother found out that her 15-yr-old son was becoming a ganja addict? She came up with a unique treatment. Tie him to a pole & rub mirchi powder in his eyes & not untie him until he promises to quit. Incident in Kodad, #Suryapet dt, #Telangana. pic.twitter.com/Kw8FXaqtz7
— Krishnamurthy (@krishna0302) April 4, 2022
15 वर्षांच्या मुलाच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, एका मुलाला खांबाला बांधले आहे. आणि एक महिला त्याच्या डोळ्यात लाल तिखट घालून वचन मागत आहे. हि महिला दुसरी कोणी नसून या मुलाची आई आहे. आपल्या मुलाला गांज्याचं व्यसन लागल्याचं कळताच या महिलेला आपला राग अनावर झाला आणि तिने त्याला खांबाला बांधले आणि त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. जोपर्यंत तो नशा सोडण्याचं वचन देत नाही तोपर्यंत त्याला खांब्याला बांधून ठेवले. मिरची पावडर डोळ्यात गेल्यामुळे हा मुलगा वेदनेने तडफडत होता मात्र तरीही आईला वचन दिल्यानंतरच तिने त्याची सुटका केली.
तेलंगणामधील घटना
ही घटना तेलंगणामधील आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या आईची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. आपल्या मुलाचे व्यसन सोडवण्यासाठी आईने मुलाला जी शिक्षा दिली आहे ती योग्य असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. या शिक्षेमुळे मुलाच्या डोळ्याला इजा होऊ शकते असेदेखील काही लोकांचे म्हणणे आहे.