VIDEO: जर मला काही झालं तर.. असं म्हणताच ‘त्या’ महिला डॉक्टरचे डोळे पाणावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून आज अनेक डॉक्टर, नर्स, वैद्यकीय, कर्मचारी, पोलीस कोरोनाशी लढत आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये व्यस्त असणार्‍या या लोकांचे मनोबल वाढतच आहे. यात डॉक्टरांचा प्रामुख्याने समावेश आहे. अनेक डॉक्टर गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून लांब राहून रूग्णांवर उपचार करीत आहे. दिल्लीतील एम्सचे डॉक्टरही संपूर्ण उत्साहाने दिवसरात्र कोरोना संसर्गाविरूद्ध लढा देत आहेत. त्यातीलच एक एम्सच्या डॉ. अंबिका कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुटुंबापासून दूर आहेत.

एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. अंबिका म्हणाल्या, ‘करोना रुग्णांवर उपचार करणं त्यांना बरं करणं हे कोरोना विरोधातील एक युद्ध आहे. कधी-कधी मला भीती वाटते की, मी आणि माझे कुटुंब या संसर्गाला बळी पडलो तर… जर मला काही झाले तर माझं कुटुंबीय मला भेटायला येऊ शकणार नाहीत आणि जर त्यांना काही झाले तर मी जाऊ शकणार नाही’, असं म्हणत असताना तिचे डोळे पाणावले. मात्र, इतकं असतानाही त्यांनी कधीच मला घरी ये म्हणून सांगितलं नाही किंवा कोणतीही तक्रार केली नाही. सेवा करत राहा असंच ते मला नेहमी सांगत असल्याचे डॉ. अंबिकांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यात आज २३ नवे करोनाग्रस्त, राज्यातील आकडा पोहोचला ८९१ वर

१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क घालून स्वतःच चालवली गाडी

मिस इंग्लंडचा मुकुट उतरवून ‘ही’ भारतीय सुंदरी बनली डाॅक्टर