वाई | सुरूर ता. वाई हे गाव धावजी पाटील या मंदिरामुळे राज्यात प्रसिद्ध असून या मंदिरात काही तांत्रिक मांत्रिक गोष्टी घडत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्याने येथील पूजा-यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र आता चक्क सुरूर येथील स्मशानभूमी या मंदिरापासून काही अंतरावरच आहे. या स्मशानभूमीत मात्र अघोरी प्रकार घडला आहे. या स्मशानभूमीत एका लाल शर्ट घातलेल्या तंत्रीकाने एका अल्पवयीन युवतीच्या मांडीवर कोंबडा देवून मांत्रिकाने पूजा केली. अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याच्या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल व्हायरल होत आहे.
स्मशानभूमीत हळदी कुंकवाचे गोलाकार रिंगण आखून त्याशेजारी अंडे, नारळ, लिंबू, काळी बाहुली ठेवून अल्पवयीन मुलीस केस मोकळे सोडून बसविल्याचे ग्रामस्थांच्या पहाण्यात आले. काही नागरिकांनी या मुलीसोबत आलेल्या स्त्रियांना व पुरुषांना हटकले असता आमच्या मुलीस बाहेरची बाधा झाली असून ती काढण्यासाठी व कोंबडा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत असे यावेळी सांगण्यात आल्याने व या मुलीसोबत असलेल्या महिलांनी गोंधळ करावयाला सुरुवात केली. तेव्हा स्मशानभूमीत ग्रामस्थ बहुसंख्येने जमा झाल्यावर तेथील लोकांनी स्मशानभूमीतून पळ काढला.
व्हिडीओ व्हायरल : वाई तालुक्यातील सुरूर येथे स्मशानभूमीत मांत्रिकाकडून अघोरी पूजा pic.twitter.com/BGbvYIz8KR
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 27, 2021
दरम्यान स्मशानभूमी परिसरात सुरु असलेले अंधश्रद्धेचे प्रकारामुळे लोकांच्यात विविध चर्चेला उधाण आले आहे. तसेच स्मशानभूमीत हा प्रकार घडल्याने स्थानिक प्रशासनाने यात लक्ष घालून हे प्रकरण तडीस नेण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.