Thursday, March 30, 2023

VIDEO: अन विद्या बालनने घातला चक्क मोदक करण्याचा घाट

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउनमुळे बॉलिवूड सेलिब्रिटींना घरातच वेळ घावलावण्याशिवाय पर्याय नाही. दरम्यान घरात राहून यासोबतच ते आतापर्यंत कधीही न केलेल्या गोष्टी शिकण्याचा नव्याने प्रयत्न करत आहेत. सध्या अभिनेत्री विद्या बालनही घरात राहून स्वयंपाक शिकण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे तिने चक्क मोदक करण्याचाच घाट घातला. विद्याने इन्स्टाग्रामवर मोदक करतानाचा व्हिडिओ शेअर केला. यात ती म्हणते, ‘अनेक वर्षांपूर्वी मी आईला स्वयंपाकात मदत करायचे. इतक्या वर्षांमध्ये सवय मोडली. पण या लॉकडाउनमध्ये नव्याने प्रयत्न करत आहे.” यापूर्वी तिने घरातच साडीच्या ब्लाऊजपीसने मास्क कसं तयार करायचं याची सोप्पी पद्धत सांगितली होती. विद्या न मोदक करताना बऱ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत चला तर पाहूया काय म्हणते विद्या..

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.”

- Advertisement -