मुंबई | बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीचे विश्व झिरो फिगरच्या भोवती फिरत असताना अभिनेत्री विद्या बालन हिने ही स्टिरिओटाईप परंपरा तोडत मिलन लुथरा निर्देशित डर्टी पिक्चर या चित्रपटात सामान्य फिगरकडेच लक्ष दिले या लुकचा मला अभिमान असल्याचे विद्या बालन हिचे म्हणणे आहे.
दक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला सात वर्षे झालीत. विद्या बालनला या चित्रपटाने चांगलेच प्रकाश झोतात आणले. यासंदर्भातील इंस्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टबाबत विद्या बालनने म्हटले आहे कि, या चित्रपटाने तिचे जीवनच नेहमीसाठी बदलून टाकले.
आजच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर रोजी 2011 साली ‘डर्टी पिक्चर’ रिलीज झाला होता आणि या चित्रपटामुळे माझे जीवन बदलले. परंतु प्रत्येकवेळी मला विचारले जाते कि, मी हे कसे केले. यावर मी काय म्हणावे, हे मला कळत नाही. कदाचित मिलनने माझ्यासाठी सर्व काही सोपे करून टाकले होते. मला ‘सिल्क’ला न्याय द्यावयाचा होता आणि चित्रपटाच्या निर्माता एकता कपूर आणि निर्देशक मिलन यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला होता. त्याच्या कसोटीवर मला खरे उतरायचे होते, असे 39 वर्षीय विद्या बालन हिने लिहीले आहे.
या चित्रपटात तुषार कपूर, नसिरुद्दीन शाह आणि इम्रान हाशमी हे सुद्धा होते. हा चित्रपट 2011 साली रिलीज झाला होता. विद्या बालनने सिल्क स्मिताची जीवंत भूमिका साकारून प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. तसेच राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला होता.
मुक्त संचार करणा-या पक्षाची अनुभूती दिल्याबद्दल विद्याने लुथरा यांचे आभार मानले असून एकता कपूरने 1990 च्या “हम पाच” आणि “डर्टी पिक्चर” सारख्या हिट चित्रपटात संधी दिली याबद्दलही विद्याने एकताचे आभार मानले आहे. या पोस्टसोबत मिलनचे एक चित्रही विद्याने पोस्ट केले आहे. यात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोन यांच्या लग्नाच्या शनिवारी रात्रीच्या रिसेप्शनचा फोटो आहे