… म्हणून १६ डिसेंबरला “विजय दिवस” साजरा केला जातो; भारतीय सैन्याच्या गौरवाचा दिवस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विजय दिवस | १६ डिसेंबर हा दिवस भारतभर ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शाळा महाविद्यालयांमधे या दिवशी जश्न मनवला जातो. परंतू अनेकांना विजय दिवस का साजरा केला जातो? विजय दिवसाचा इतिहास काय आहे याची माहिती नसते. १६ डिसेंबरला असं काय झालं होतं की आपण हा दिवशी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करतो हे आज आपण जाणुन घेणार आहोत.

हा तोच दिवस आहे ज्या दिवशी आपण पाकिस्तानचा युद्धात दारुन पराभव केला होता. १९७१ च्या डिसेंबर महिण्यात सुरु झालेले हे युद्ध सलग १३ दिवस चालू होते. पाकिस्तानी आर्मीचे जनरल ए.के. नियाजी हे ९६,००० एवढे प्रचंड सैन्यबळ घेऊन भारतावर चाल करुन आले होते. पाकिस्तानच्या आक्रमणामुळेच १९७१ च्या युद्धाला तोंड फुटले. पुर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान याच्यात मोठी फुट पडली होती. भारताने पुर्व पाकिस्तान म्हणजेच सध्याचा बांग्लादेश यास आपला पाठींबा दर्शवला. नेमकी हिच गोष्ट पाकिस्तानला पटली नाही आणि पाकिस्तान आर्मीने भारतावर चालून येण्याचा पवित्रा घेतला. परंतू १३ दिवस चाललेल्या या युद्धात पाकिस्तानला हार मानावी लागली. जवळपास १३ दिवसांच्या युद्धानंतर १६ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेशातील ढाका येथे ९६००० पाकिस्तानी सैन्याने भारतीय आणि बांगलादेशी सैन्यासमोर शरणागती पत्करली. या युद्धात भारताचे ३९०० वीर धारातीर्थी पडले, तर ९८५१ वीर जखमी देखील झाले.

भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यावर मिळवलेल्या या अभुतपूर्व विजयामुळे १६ डिसेंबर हा दिवस देशभर विजय दिवस म्हणुन साजरा केला जातो. या दिवशी युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते. विजयाची आठवण म्हणुन देशाच्या कानाकोपर्यांत जश्न साजरा केला जातो. यामुळे नव्या पिढीला भारतीय सेनेच्या कामगिरीबद्दल माहिती मिळते आणि हा अभिमानास्पद इतिहासाची ओळख होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment