केंद्र सरकार हव्या तेवढ्या नोटा छापू शकतं, प्लिज माझ्यावरील केस मागे घ्या – विजय मल्ल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा गंभीर परिणाम पडला असून यातून देशाला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. मोदींच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. सार्वजनिक बँकांचे कर्ज बुडवून पळून गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्यानंही पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच केंद्र सरकार हव्या तेवढ्या नोटा छापू शकतं, प्लिज माझ्यावरील केस मागे घ्या असंही मल्ल्याने म्हटलं आहे.

“करोनाशी लढा देण्यासाठी पॅकेज जाहीर केल्याबद्दल केंद्र सरकारचं अभिनंदन. सरकार इच्छा असेल तर आवश्यक तितक्या नोटा छापू शकते. पण, सार्वजनिक बँकांचं १०० टक्के कर्ज परत करण्याची ऑफर देणाऱ्या माझ्यासारख्या छोट्या मदत करू इच्छिणाऱ्याकडे (Contributor) सतत दुर्लक्ष केलं पाहिजे का? माझी विनंती आहे की, कोणत्याही शर्थींशिवाय पैसे घ्या आणि हे संपवा,” असं विजय मल्ल्या यानं ट्विट करून म्हटलं आहे.

दरम्यान, विजय मल्ल्या याने यापूर्वीही आपण कर्ज फेडण्यास तयार आहोत. मात्र माझ्यावरील केस मागे घ्या अशी मागणी केली होती. कर्नाटक उच्च न्यायालयात आपण सर्व संपत्तीविषयी माहिती सांगितली आहे. ती घेऊन किंगफिशर एअरवेजला वाचवा असं आवाहन देखील मल्ल्याने केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.