ओबीसींच राजकीय आरक्षण संपवण्याचा भाजपचाच डाव – विजय वडेट्टीवार यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्यांवरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर सतत हल्लाबोल केला जात आहे.  दरम्यान, भाजपचे नेते सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे  यांनी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यावर टीका करीत यातील कुणीतरी झारीतील शुक्राचार्य आहेत,” असे म्हंटले होते. त्याला राज्याचे मदत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले. “झारीतील शुक्राचार्य हे भाजपमध्येच असून ओबीसींच राजकीय आरक्षण संपवण्याचा भाजपचाच डाव” असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी ‘अनुसुचीत जाती आणि जमाती सोडून कुठल्याही जातीची जातीनुसार जनगणना होणार नाही, केंद्राकडे असेलला डाटाही देणार नाही’, असेओबीसी आरक्षणाबाबत म्हंटले आहे. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर केंद्रातील भाजप सरकारचीच ओबीसींना आरक्षण देण्याची भूमिका नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून आज मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधत ओबीसी आरक्षणाबाबत सत्य परिस्थिती मांडली.

राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, देशातील महाराष्ट्र ओदिशा या दोन राज्यातील राज्य सरकारने केंद्राकडे ओबीसींची जातनुसार जनगणनेची मागणी केली होती. मात्र त्याबाबत माहिती देण्यास केंद्र सरकारने त्यांना नकार दिला आहे. यामुळेओबीसी समाजाची निराशा झाली आहे. केंद्र सरकारने नकार दर्शविल्यानंतर आता राज्यातील भाजपमधील नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.

Leave a Comment