खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा अन्यथा…; वडेट्टीवारांचा पडळकरांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर संतप्त झालेल्या वडेट्टीवारांनी पडळकरांवर ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जर खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध करा असे आव्हान देखील त्यांनी पडळकराना दिले.

पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले

जिल्ह्यात एकाही दुकानात माझी किंवा नातेवाईकांची भागीदारी नाही. यानंतरही चुकीच्या माहितीच्या आधाराने पत्र लिहून आरोप केले आहेत. पडळकर तू एका बापाचा असशील तर आरोप सिद्ध करून दाखव अन्यथा ५० कोटींचा दावा टाकणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Leave a Comment