विकास लाखे यांचा खूनच; पोलिसांनी केला खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये पूर्वीच्या भाडणांचा राग मनात धरून आगाशिवनगर येथील पत्यांचा क्लब चालविणार्‍या विकास रघुनाथ लाखे यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. असं तपासात पुढे आलं असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस प्रमुख धीरज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, कराड गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने संशयित म्हणून दोघांना मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतल.

बुधवारी त्यांना कराड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अर्जुन रामचंद्र पोळ आणि  अमित ऊर्फ संदिप तातोबा कदम अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. हे आरोपी हे कर्नाटक राज्यासह, सांगली, विटा, पंढरपूर, मुंबई, तिरूपती. म्हैसूर, ऊटी, असे वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होते. आरोपीवर अनेक गुन्हे यापूर्वीही दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलिस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी विजय गोडसे यांनी केली आहे.