हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने १०२ व्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षणाचे सर्वाधिकार राज्यांना दिलेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा आणि त्यासाठी ८ दिवसांत मागासवर्ग आयोग गठीत करुन मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू करावं तसेच मागासवर्गीय आयोगात हरी नरकेंसारखे अनेक जातीवादी लोकांचा समावेश न करता आयोगाची पुनर्रचना करावी अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली.
विनायक मेटे म्हणाले, राज्य मागासवर्गीय आयोगाकडे जी लोक आहेत त्यांच्यातील बरीचशी लोक हि जातीयवादी आहेत ती लोक तुम्हाला बदलावी लागतील अन्यथा मराठा समाजाला मागच्या काळामध्ये सराफ आयोग असेल किंवा दुसरे कोणते आयोग असतील त्यात हरी नरके यांच्यासारखी जातीयवादी लोक होती त्यांनी मराठा समाजाचे आरक्षण बाजूला ठेवलं तसेच यावेळेसही होऊ शकत आणि मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेऊ शकतात, त्यामुळे आयोगाची पुनररचना करणं आवश्यक आहे असं विनायक मेटे यांनी म्हंटल
यावेळी त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर देखील सडकून टीका केली.अशोक चव्हाण पूर्वी अधिकार नाही म्हणून ओरडत होते. आता अधिकार दिले तर अधिकार देऊन काय उपयोग असे म्हणत आहेत त्यामुळे निष्क्रिय असलेल्या अशोक चव्हाण यांच्याकडून मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घ्यावी अशी मागणी विनायक मेटे यांनी केली.