हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांवर संकट आले असताना शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरी बसूनच काम करत आहेत अशी टीका सतत विरोधकांकडून होत असते. त्यातच आता शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात होते. शेतकऱ्यांच्या मदतीला नेहमी धावून जाणाऱ्या बाळासाहेबांचाच वारसा उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावा. अन्यथा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडून द्यावी, अशी टीका विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केली. विनायक मेटे यांनी नुकताच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बीड भागाचा दौरा केला. तेव्हा त्यांनी हे वक्तव्य करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
यावेळी विनायक मेटे उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उदाहरण देत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई सोडून शेतकऱ्यांच्या शेतात जावे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात असत. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा हा वारसा सिद्ध करावा अन्यथा खुर्ची सोडावी, असे मेटे यांनी म्हटले. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. विनायक मेटे यांनी बीडसह शिरूर तालुक्यातील पौंडूळ, खांबा – लिंबा, खालापुरी या गावातील नुकसानीची पाहणी मेटे केली.
राज्यातील अतिवृष्टीनंतर शरद पवार आजपासून दोन दिवस मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालपासूनच बारामतीमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत दौऱ्याला सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारभार करण्याच्या कार्यपद्धतीवर टीका होऊ लागली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’