हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा झाली अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिल्यानंतर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी संभाजीराजे- पवार भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केवळ 10 मिनिटात चर्चा कशी होऊ शकते असा सवाल केला आहे.
लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकते. मात्र, शरद पवार यांचा मराठा आरक्षणाविषयीचा आजपर्यंतचा दृष्टीकोन पाहता या भेटीतून काहीही साध्य होणार नाही. मराठा आरक्षण, नोकऱ्या आणि सारथी या महत्वाच्या विषयांवरची चर्चा 10 मिनिटांत कशी पूर्ण झाली? पण आता संभाजीराजे चर्चा सकारात्मक झाली, असे म्हणत असतील तर पुढे काय होते ते बघू, असे मेटे यांनी सांगितले.
पवारांसोबत सकारात्मक चर्चा- संभाजीराजे
दरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे. तसंच मराठा समाजाच्या परिस्थितीची कल्पना शरद पवारांना दिली. तुम्ही पुढाकार घ्यावा अशी मी विनंती केली असून मुख्यमंत्री, विरोधी पक्ष, नारायण राणे यांना एकत्र आणलं पाहिजे असा आग्रह केला,” अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.