नागपूरमध्ये भररस्त्यात 7 तरुणींमध्ये फ्री- स्टाईल हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये आज मुलीच्या दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सात मुली एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ हिस्लॉप कॉलेज रोडवरील आहे. मात्र हि हाणामारी नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याची माहिती अजून समोर आलेली नाही. या मुली मारहाण करताना अश्लील शिवीगाळ करतानासुद्धा दिसत आहेत. यासंदर्भात पोलिसांत अजून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या मुली महाविद्यालयीन विद्यार्थीनी असल्याचे समजत आहे.

भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने उपस्थितांपैकी एकाने या हाणामारीचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सात मुली एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. हि घटना हिस्लॉप कॉलेज रोडवर घडली आहे. या व्हिडिओमध्ये दोन मुली एक मुलीला मारहाण करत आहेत. दुसरीकडं दोन-दोन मुलींमध्ये चांगचीच झटापट होत आहे. एकीला खाली पाडून दोन जणी तिला मारहाण करत आहेत. बाजूलाच दोन-दोन मुलींमध्ये चांगलीच हाणामारी होत आहे.

या मुली पार एकमेकींची केसं पकडून मारहाण करत आहेत. त्यांची मारहाण पाहून असे वाटत आहे कि खूप दिवसांपासूनचा राग एकदम बाहेर आला आहे. त्या मुली एकमेकींना चितपटही करत आहेत. चांगलीच झटापट त्यांच्यात होत आहे. त्यांच्या बाजूला काही तरुण या मुलींची फ्री स्टाईल हाणामारी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. मात्र याविरुद्ध अद्याप अजून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.