राज ठाकरेंकडून जयंत पाटलांचा समाचार; थेट नक्कल करत म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या ठाणे येथील उत्तरसभेत महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस वर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या टिकेचा थेट त्यांची नक्कल करत जोरदार समाचार घेतला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जयंत पाटलांचा जंत पाटील असा उल्लेख केला. जंत पाटील म्हणतात, राज ठाकरे उत्तर प्रदेशात कधी गेले होते. उत्तर प्रदेशात यांना काय कौतुक? जंत पाटील माझे भाषण नीट ऐकत जा. मी म्हटलं होतं, ज्या बातम्या कानावर येत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये विकास झाला असेल तर त्याचा मला आनंद आहे. मी जर तर बोलोलो होतो. जयंत पाटील यांना मतदारसंघ सोडला तर कोण विचारतो असंही राज ठाकरे म्हणाले.

अजित पवार यांच्या नातेवाईकांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होते पण सुप्रिया सुळे यांच्यावर कारवाई कशी होत नाही असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत अशी टीका त्यांनी केली. ईडीची धाड पडली की पवार साहेब मोदींची भेट घेतात आणि आता कोणावर रेड टाकायची ते सांगतात असेही राज ठाकरे यांनी सांगितले.