IND Vs AUS मॅचदरम्यान व्हायरल झालेल्या ‘सुंदरीची’ ओळख पटली; पहा कोण आहे ती?

0
1646
Payal gaming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकताच ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना 4 मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. यानंतर भारताच्या शानदार कामगिरीबरोबर चर्चा सुरू झाली ती स्टेडियमवर कॅमेरामॅनने टिपलेल्या एका सुंदर मुलीची. ही मुलगी स्टेडियमवर टीम इंडिया जर्सी परिधान करून फोनमध्ये फोटो क्लिक करताना स्क्रीनिंग बोर्डवर दिसली. त्यामुळे ही मुलगी नेमकी कोण होती? याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अखेर नेटकऱ्यांनी तिची ओळख पटवली आहे.

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमी फायनल मध्ये चर्चेत राहिलेल्या मुलीचे नाव आहे पायल धारे. पायल धारे ही एक भारतातील सुप्रसिद्ध गेमिंग स्ट्रीमर आणि कंटेंट क्रिएटर असून ती “Payal Gaming” या नावाने ओळखली जाते. ती सध्या S8UL Esports संघाशी जोडलेली आहे. खास म्हणजे, तीचे यूट्यूबवर तब्बल 4 मिलियनपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आहेत. ज्यामुळे ती भारतातील आघाडीच्या महिला गेमर्सपैकी एक मानली जाते.

पायल धारे चर्चेत कशी आली?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यात पायल धारे भारतीय संघाचे समर्थन करण्यासाठी उपस्थित राहिली होती. त्यावेळी सामन्याचे व्हिडिओ काढत असताना ती कॅमेऱ्यात कैद झाली आणि तीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यामुळे ही मुलगी नेमकी कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली. त्यानंतर गेमिंग क्षेत्रातील तिच्या चाहत्यांनी ही “Payal Gaming” असल्याचे सांगितले. या घडलेल्या प्रकारामुळे पायल धारे चर्चेत आली आणि तिचे फॉलोवर्स देखील अधिक वाढले.

कोण आहे पायल धारे?

मध्य प्रदेशमधील पायल धारे हिने गेल्या काही वर्षांमध्ये गेमिंग विश्वात मोठे नाव कमावले आहे. ऑनलाइन गेमिंगमध्ये महिलांची उपस्थिती तुलनेने कमी असताना पायल धारे या क्षेत्रात पाय रोवून उभी आहे. महत्वाचे म्हणजे, तिने 2023 मध्ये त्यांनी माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी तिने त्यांच्याशी संवाद साधला होता. या भेटींचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर उपलब्ध आहेत. आता हे फोटोज देखील सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा भाग बनले आहेत.