हेल्मेट न घातल्याने पोलीस कर्मचाऱ्याने स्कूटी चालकाला चक्क धक्का देत खाली पाडलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – दुचाकी चालवताना हेल्मेट (helmet) घालणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, अनेक दुचाकीचालक हे हेल्मेट (helmet) न घालता या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे पोलीस हेल्मेट (helmet) परिधान न केलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई करत त्यांच्यावर दंड ठोठावतात. मात्र, तरी सुद्धा अनेक दुचाकीस्वार या गोष्टीला गांभीर्याने घेत नाहीत. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, हेल्मेट (helmet) शिवाय दुचाकी चालवणाऱ्यांना पोलीस कर्मचारी थांबवत आहेत त्याच दरम्यान एक स्कूटी चालक गाडी न थांबवता पुढे निघून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यावेळी तेथे उपस्थित असलेला पोलीस कर्मचारी चक्क त्या दुचाकीस्वाराला धक्का देऊन खाली पाडतो. धक्का दिल्याने स्कूटीवरील दोन्ही तरुण खाली कोसळतात. स्कूटीचा वेग जास्त नसल्यामुळे या दोघांना गंभीर दुखापत झालेली नाही.

हा व्हायरल होणार व्हिडिओ बिहारमधील जमुई येथील आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सकडून संताप व्यक्त केला जात आहे. हेल्मेट (helmet) परिधान न केल्यामुळे अशा प्रकारची शिक्षा देणे कितपत योग्य आहे असा सवाल लोकांकडून उपस्थित केला जात आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती