हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात सध्या बिहार निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असून मतदार राजाची मते जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमे सुद्धा बिहार मध्ये तळ ठोकून आहेत. बिहारच्या जनतेचे मत जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सध्या राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरताना दिसत आहे. मात्र अशाच एका प्रतिनिधिला अगदी आश्चर्यकारक अनुभव लखीसरायमध्ये आला.
या पत्रकाराने एका स्थानिक वृद्धाला विकास आला का असा प्रश्न विचारला. म्हणजेच सध्याचे सत्ताधारी सरकार आल्यानंतर तुमच्या परिसराचा विकास झाला का असं या पत्रकाराला विचारायचे होते. मात्र पत्रकाराच्या या प्रश्नाला आजोबांनी असं काही उत्तर दिलं ती त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार बिहार तकच्या पत्रकाराबरोबर घडला असून सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
https://twitter.com/UtkarshSingh_/status/1316806291365351424?s=20
पत्रकाराने आजोबांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांना, “तुमच्या गावामध्ये विकास पोहचला आहे का?” असा प्रश्न विचारला. मात्र या प्रश्नामुळे गोंधळलेल्या आजोबांनी विकास एखादी व्यक्ती असल्याप्रमाणे उत्तर दिलं. “विकास? मी (तेव्हा) नव्हतो इथे. आजारी होतो. डॉक्टरकडे गेलो होतो,” असं उत्तर या आजोबांनी दिलं.
आजोबांचा हा व्हिडिओ देशभरात प्रचंड प्रमाणात वायरल झाला असून अनेक नेटकर्यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’