बिहारमध्ये बलात्काराच्या आरोपीला अजब शिक्षा! पाच उठाबशा काढ आणि…..

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बिहार : वृत्तसंस्था – बिहारमध्ये एक अजब प्रकरण समोर आले आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला पंचायतीने आरोपीला पाच उठाबशा काढायला सांगत नंतर सोडून दिले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नवदा जिल्ह्यातील कन्नौज गावात हा प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी याची दखल घेतली आहे.

काय आहे प्रकरण?
आरोपीने अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पोल्ट्री फार्मवर नेऊन बलात्कार (Rape) केला होता. मात्र पंचायतीने आरोपीला पोलिसांकडे न सोपवता स्वतःच न्यायनिवाडा केला. विशेष म्हणजे, आरोपी बलात्काराचा दोषी असल्याचे त्याने मान्य केले होते. मुलीला एका निर्जनस्थळी नेलं असल्याने पंचायतीने आरोपीला ही शिक्षा सुनावली. पंचायतीने आरोपीला शिक्षा म्हणून पाच उठाबशा काढायला लावल्या. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी या शिक्षेविरोधात संताप व्यक्त केला आहे.

पोलीस अधीक्षक गौरव मंगला यांनी याप्रकरणी गुन्हा (Rape) दाखल केला असून या व्हिडिओच्या आधारे आरोपीना पकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचीही पोलीस चौकशी करणार आहे. त्यामध्ये दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!