Viral Video| घरासमोर बसलेला कुत्रा अचानक झाला गायब, सीसीटीव्ही फुटेज पाहून फुटेल घाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video | सध्या इंटरनेटचे जग आलेले आहे. आपण इंटरनेटवर अनेक व्हिडिओ पाहत असतो. अनेक व्हिडिओ हे मनोरंजन करणारे असतात. तर अनेक व्हिडिओ पाहून आपल्याला धक्काच बसतो. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. जो व्हिडिओ पाहून तुम्हाला भीती वाटेल या व्हिडिओमध्ये घरासमोर झोपलेला एक कुत्रा अचानक गायब होतो परंतु त्या कुत्र्यासोबत नेमके काय घडले? ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली आहे हे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच घाम फुटेल.

ही घटना आंबेगाव तालुक्यातील ढोबळेवाडी जारकरवाडी येथे घडलेली आहे. येथे राहणारे उद्योजक अविनाश बाबुराव ढोबळे यांच्या घरासमोर एक कुत्रा झोपलेला होता. त्यानंतर जो काही प्रकार घडला तो अत्यंत धक्कादायक होती. एका बिबट्याने या कुत्र्याची शिकार केली. तो बिबट्या कुत्र्यावर हल्ला करताना दिसला. त्या बिबट्याने कुत्र्याला जबड्यात धरले आणि ओढून दिले.

नाशिकमध्ये देखील घडली होती अशी घटना | Viral Video

यादी नाशिकमध्ये देखील एका घराच्या आवारात बसलेल्या एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता. रात्रीच्या सुमारास हा कुत्रा बसलेला असताना अचानक तिथे बिबट्या आला. आणि त्यांनी किशोर उगले यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. त्या कुत्र्याने बिबट्याला चकवा दिला मात्र बिबट्याने त्या कुत्र्यावर झडप घातली. आणि त्या हल्ल्यांमध्ये कुत्र्याचा बळी गेला. या घटनेनंतर त्यांच्या गावात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

किशोर उगले यांच्या घराच्या आवारात हा सीसीटीव्ही बसवला होता. आणि या सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झालेली आहे. त्याचप्रमाणे इथे आलेला सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसला. आता घडलेली ही घटना देखील त्याचप्रमाणे आहे. परंतु ही घटना पाहून आता सगळ्यांनाच खूप भीती वाटायला लागलेली आहे.