हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीम इंडियाचा माजी कर्णधार Virat Kohli ची गणना जगातील स्टार्स खेळाडूंमध्ये केली जाते. या महान फलंदाजाची सोशल मीडियावरही वेगळीच झलक पहायला मिळते. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या व्यक्तींमध्ये विराट कोहलीचे नाव देखील सामील आहे. कोहली अनेकांसाठी प्रेरणास्थानी आहे. मैदानावरील त्याची आक्रमकता त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळी बनवते. दरम्यान, इन्स्टाग्राम वरील एका पोस्टद्वारे Virat Kohli ला किती कमाई होते हा नेहमीच एक चर्चेचा विषय बनून राहिला आहे.
33 वर्षांचं Virat Kohli सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. गेल्या 3 वर्षांपासून त्याने कोणत्याही फॉरमॅटमध्ये एकही शतक झळकावलेले नाही. ‘किंग कोहली’ या नावाने चाहत्यांध्ये प्रसिद्ध असलेल्या विराटचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे आणि त्यामध्ये दिवसागणिक वाढही होते आहे. तो विशेषत: सोशल मीडियावर तो सर्वाधिक फॉलो केला जाणारा क्रिकेटर बनला आहे.
आपल्या खेळाप्रमाणेच फॉलोअर्स आणि कमाईच्या बाबतीतही Virat Kohli इंस्टाग्रामवर अव्वल क्रिकेटर ठरला आहे. hopperhq.com या वेबसाइटने दिलेल्या रिपोर्ट्स नुसार, इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप सेलिब्रिटींच्या लिस्टमध्ये कोहली 14 व्या स्थानावर आहे. टॉप-25 मध्ये तो एकमेव आशियाई खेळाडू आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 20 कोटींहून जास्त फॉलोअर्स देखील आहेत.
एका रिपोर्टनुसार, Virat Kohli ने आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे सुमारे 8.69 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हे जाणून घ्या कि, इंस्टाग्राम पोस्टद्वारे सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या लिस्टमध्ये पोर्तुगालच्या स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 44 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. तर एका पोस्टमधून त्याला सुमारे 19 कोटी रुपये मिळतात.
या लिस्टमध्ये अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला एका पोस्टमधून सुमारे 14 कोटी रुपये मिळतात. या लिस्टमध्ये दुसरे नाव अमेरिकन मॉडेल काइली जेनरचे आहे, जिला एका इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे 14.6 लाख रुपये मिळतात.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.instagram.com/virat.kohli/
हे पण वाचा :
फक्त रणवीरच नाही… तर ‘या’ स्टार्सनी देखील NUDE photoshoot करून माजवली होती खळबळ !!!
FD Rates : आता ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक FD वर देणार जास्त व्याज, नवीन दर तपासा
BSNL चे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 1.64 लाख कोटी रुपयांचे पॅकेज मंजुर
Bank Holiday : ऑगस्टमध्ये बँका 17 दिवस राहणार बंद, बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा