नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बऱ्याच दिवसांपासून त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. आयपीएल 2022 मध्ये देखील त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. मागच्या काही काळापासून विराटची (Virat Kohli) बॅट शांत आहे. त्याच्या बॅटमधून शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये निघाले होते. त्यानंतरही तो सातत्यानं चांगल्या खेळी खेळत होता. मात्र, त्याला शतक करता आले नव्हते. आयपीएल 2022 मध्येही त्याची सुमार कामगिरी दिसून आली. तो आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये तीन वेळा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यामुळे त्याला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी सल्ले देखील दिले. तर अनेकांनी त्याला काही दिवसांची सुट्टी घेण्याचा आणि स्वत:साठी वेळ देण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर आता रिकी पाँटिंगने विराटच्या कामगिरीवर भाष्य केले आहे.
रिकी पाँटिंगची प्रतिक्रिया
क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंगने विराट कोहलीच्या फॉर्मवर भाष्य केले आहे. तो म्हणाला कि, ‘अशी परिस्थिती प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत एकदा येते. विराट (Virat Kohli) गेल्या 10-12 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. इतका वाईट टप्पा त्याने कधीच पाहिला नव्हता. त्याला आयपीएलमध्ये पाहून कोहली थकल्याच्या चर्चा होतायेत. मला वाटतं की कोहलीनं (Virat Kohli) याचा विचार करावा आणि सुधारण्यासाठी काहीतरी मार्ग काढायला हवा. मग ते तांत्रिक असो वा मानसिक, यावेळी पाँटिंगनं एकूणच त्याला स्वत:कडे पूर्ण लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
चांगले दिवस पुन्हा येतील
विराट कोहलीबद्दल (Virat Kohli) रिकी पाँटिंग पुढे बोलताना म्हणाला की, ‘माझ्या अनुभवातून मला एक गोष्ट कळते की खेळाडू थकत नाहीत, असा विचार करून स्वतःची फसवणूक करत असतात. अशा वेळी नेहमीच सराव करण्याचा आणि सामन्यासाठी स्वत: ला तयार करण्याचा मार्ग शोधायला हवा. रिकी पुढे म्हणतो की, मला वाटतं कोहलीच्या बाबतीतही असंच काहीसं घडतंय. मात्र, कोहलीचा खराब फॉर्म फार काळ टिकणार नाही, असा विश्वास पाँटिंगने व्यक्त केला आहे.
हे पण वाचा :
BSNL च्या ‘या’ ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडसह मिळवा OTT बेनेफिट्स !!!
हिंगोलीत जुन्या वादातून मुलांनी जन्मदात्या वडिलांला संपवलं
भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेने मंदिरात हनुमानाचा चांदीचा डोळा चोरला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Aadhar card शी संबंधित फसवणूक कशी टाळावी???
रस्त्यावर झालेल्या वादानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवले, धक्कादायक व्हिडिओ आला समोर