व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या ६ जागांसाठी काल मतदान पार पडले. भाजपने निवडणुकीत तिसरा उमेदवार दिल्याने राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीचा निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार याचा धक्कादायक पराभव झाला तर धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या निवडणुकीतील निकालाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकीच्या निकालामुळे धक्का बसलेला नाही. मतमोजणी बाबत झालेला उशीर म्हणजे भाजपचा रडीचा डाव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विविध मार्गांनी माणसांना आपलंसं करणं त्या मार्गात त्यांना यश आलं आहे. पण, यामुळे सरकारला काही धोका नाही, असे पवार यांनी म्हंटले.

राज्यसभेच्या निकालानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला स्वतःला निकालाने फार धक्का बसला असे काहीही नाही. तुम्ही जर मतांची संख्या बघितली तर मविआच्या उमेदवारांना जो कोट दिला त्यात काही कमी पडला नाही. सहावी जागा जी शिवसेनेने लढवली त्यात मतांची संख्या अगोदरच कमी होती, भाजपची संख्या जास्त होती. तरीही आम्ही धाडस केले. पण त्यात अपयश आले. अपक्षांची संख्या आमच्याकडे कमी होती.

भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष आमदार होते त्या अपक्षांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी खेळी केली त्यात त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडला आहे. बाकी महाविकास आघाडीच्या संख्येप्रमाणे मतदान झालं आहे त्यात वेगळं काही नाही. जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मान्य केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी विविध मार्गांनी माणसांना आपलंसे करणे त्या मार्गात त्यांना यश आलं आहे. पण, यामुळे सरकारला काही धोका नाही, असे पवार यांनी म्हंटले.