विराट कोहलीने मालिकेतील पराभवानंतर दिली प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येतील. व्हाईट हाऊसने मंगळवारी याची अधिकृत घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी भारत दौर्‍यावर येतील! या भेटीमुळे अमेरिका-भारत सामरिक भागीदारी आणखी मजबूत होईल.अमेरिकन आणि भारतीय लोकांमधील संबंध मजबूत आणि कायमस्वरुपी घट्ट होतील.

16 जानेवारी रोजी परराष्ट्र खात्याने सांगितले की अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रस्तावित भेटीसंदर्भात मुत्सद्दी मार्गांद्वारे भारत आणि अमेरिका संपर्कात होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी नवी दिल्ली येथे एका संमेलनादरम्यान सांगितले की “अनेक महिन्यांपासून अशी अटकळ बांधली जात होती की पंतप्रधान मोदींनी जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली तेव्हा मोदिनी त्यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते.या वर दोन्ही देश एकमेकांशी संपर्क साधत आहे. जेव्हा आम्हाला ठोस माहिती मिळेल तेव्हा आम्ही आपल्याला या संदर्भात माहिती देऊ. ”

गेल्या सप्टेंबरमध्ये ह्यूस्टन येथे झालेल्या ‘हॉडी मोदी’ कार्यक्रमात ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांना भारतात आमंत्रित केले होते. त्यांनी सांगितले की त्यांची भारत यात्रा दोन्ही देशांच्या सामायिक स्वप्नांना नवी उंची देईल.