विराट कोहलीनं बाबर आझमकडं पाहून क्रिकेट शिकावं ; पाकिस्तानी खेळाडूने उधळली मुक्ताफळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. दरम्यान पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम आणि विराट कोहलीची तुलना नेहमीच दिग्गजांकडून सुरू असते. याच दरम्यान माजी पाकिस्तानी खेळाडू अकीब जावेद यानं विराट कोहली बद्दल अजब वक्तव्य केले आहे. कोहलीनं बाबर आझमकडं पाहून क्रिकेट शिकावं असं अकिब जावेदने म्हंटल.

तो पुढे म्हणाला, विराट कोहलीकडं बाबर आझमच्या तुलनेत शॉट्सची मोठी रेंज आहे. पण एका बाबतीत तो कमकुवत आहे. बॉल स्विंग होत असेल तर जेम्स एंडरसनच्या विरुद्ध तो ऑफ स्टंपच्या बाहेर फसतो. तर बाबर आझमच्या खेळात सचिन तेंडुलकर प्रमाणे कोणतीही कमकुवत बाजू नाही.’

बाबर आझमनं जर विराट कोहलीकडून फिटनेस टिप्स घेतल्या आणि त्यादृष्टीनं फिटनेसवर प्रयत्न केले तर तो आणखी चांगला खेळाडू होईल, असंही जावेद पुढे म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like