केंद्रान निवडणुका पुढ ढकलल्या असत्या तर आभाळ कोसळल नसत : बच्चू कडू कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : खरं तर निवडणूक आयोगाने पंढरपूरची पोटनिवडणूक लावायला नको होती. राज्याच्या अखत्यारीतील या सर्व निवडणुका आणि पुढे ढकलल्या. केंद्राने निवडणुका पुढे ढकलल्या असता तर आभाळ कोसळले नसते. एकदा का निवडणुका जाहीर झाल्या की प्रत्येकाला अस्तित्व दाखवावं लागतं. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांच्या जाहीरसभेसाठी पंढरपुरात होणाऱ्या गर्दीवर महाराष्ट्राचे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया दिली.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक राज्यात सध्या चांगलीच गाजत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीसाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत आ. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपने मागील तिन्ही निवडणुकीत झालेली मतविभागणी त्यामुळे कै. आ. भारत भालके यांचा झालेला विजय याचा अभ्यास करत मतविभागणी टाळण्यासाठी भाजपकडून इच्छुक असलेले आ. प्रशांत परिचारक यांची समजूत काढत एकास-एक उमेदवार देण्यात यश मिळवले आहे. समाधान आवताडे यांना उमेदवारी देऊन आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांचेकडून प्रतिष्ठेची केलेली असल्याने जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नेत्यांची वर्दळ वाढलेली आहे. त्यामुळे नेत्यांसोबत कार्यकर्त्यांचीही कुमक सोबत आहे. अनेक नेते इतर तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांना प्रचार व प्रचार यंत्रणेसाठी लागत असलेले सर्व खुराक पुरवत आहेत.

You might also like