हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या T-20 सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला असला तरी भारतीय संघ निवडीवरून माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने कर्णधार विराट कोहली वर संताप व्यक्त केला आहे. चहल आणि श्रेयश अय्यर ला वगळल्याने सेहवाग कोहलीवर भडकला. तसेच कोहलीच्या कामगिरी वर देखील सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे.
सोनी स्पोर्ट्ससोबत बोलताना विराट कोहलीवर नाराजी व्यक्त केली. पहिल्या टी-२० सामन्यात संघ निवड करताना श्रेयस अय्यर आणि चहलला का वगळण्यात आलं? असा सवाल सेहवागनं उपस्थित केला. सेहवागनं संघ निवडीवर प्रश्न उपस्थित करत असतानाच विराटच्या कामगिरीवरही नाराजी व्यक्त केली आहे. संघात स्थान मिळवण्याचा नेमका निकष काय आहे? गेल्या काही टी-२० सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला का संघाबाहेर केलं जातंय. चौथ्या क्रमांकावर अय्यर तुमचा विश्वासू खेळाडू झाला आहे. असे असतानाही कोणत्या निकषानुसार पहिल्या सामन्यातून त्याला वगळण्यात आलं? असा थेट सवाल सेहवागने केला आहे
तसेच विराट कोहली वगळता इतर सर्वांना नियम लागू आहेत का? कोहलीबाबत कोणतेच नियम लागू का होत नाहीत? त्याच्या फलंदाजी क्रमवारीत कधीच बदल होत नाही आणि त्याच्याकडून चांगली कामगिरी होत नसेल तर त्याला संघाबाहेरही बसवलं जात नाही, असा राग सेहवागने यावेळी व्यक्त केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’