सांगली प्रतिनिधी | वसंतदादांच्या समाधीस्थळावरून वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी आज लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘हा पट्ठ्या वसंतदादांचा नातू आहे. सहजासहजी हार मानणार नाही. पैसे नसले तरी यावेळी आपल्याला पैसे आणि मतं दोन्ही मिळतील.’
२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार मीच असेन आणि निवडून येऊनच दाखवू. असं म्हणत वसंतदादांच्या नातू विशाल पाटील यांनी लोकसभेसाठी शड्डू ठोकला. ज्या वसंतदादांनी सांगली मध्ये बसून राज्याचे उमेदवार ठरवले त्याच वसंतदादाच्या कुटुंबियांची अवस्था काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी अतिशय बिकट केल्याची भावना कार्यकर्त्यां कडून व्यक्त करण्यात आल्या.
आज कृष्णेच्या काठावर असणाऱ्या वसंतदादा समधीस्थळी वसंतदादा प्रेमी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी जिल्ह्यातून दादा प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी म्हातारी मेली तर चालेल, पण काळ सोकावता कामा नये. तिकीट मिळाले तर ठीक नाही तर मागे न हटता बंडखोरी करून निवडणूक लढावा आशा तीव्र शब्दात कार्यकर्त्यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या.
बैठकीत बोलताना विशाल पाटील म्हणाले, ‘बंडखोरीला धाडस लागत नाही. त्याला कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं प्रेम लागतं आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी नाही.’ लवकरच २८ तारखेनंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्याच बरोबर वसंतदादा घर संपवण्याच्या नादात तुम्ही काँग्रेस संपवत आहेत हे विसरू नका असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
इतर महत्वाचे –
सांगलीत जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांनी केली रंगांची मुक्त उधळण…
मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने… कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन ४० व्या दिवशी स्थगित
अखेर बाळू धानोरकरांच्या पाठीवर काँग्रेसचा हात