Saturday, February 4, 2023

कोरोनाला तोंड देण्याची क्षमता या राज्यातील जनतेमध्ये : विश्वजित कदम

- Advertisement -

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कोरोना विषाणू एक संकट बनून आले आहे. त्याला तोंड देण्याची क्षमता महाराष्ट्रातील जनतेत आहे. आपण सावधपणे या स्थितीला सामोरे जावू व्यक्तिगत जबाबदारी पाळू. राज्य सरकार गंभीर आहे, तुम्ही आजारांकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आज केले आहे. त्यांनी याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

कोरोना आजाराबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यातच महाराष्ट्र आणि पुण्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच सोशल मीडियावर कोरोना बाबत अनेक अफवाही पसरवल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर कृषीराज्य मंत्री विश्वजित कदम यांनी जनतेला व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केले आहे. या व्हिडीओ मध्ये  ते म्हणाले, “कोरोनाचे जागतिक संकट आहे. नागरिकांत भितीचे वातावरण आहे, मात्र भिती बाळगू नका. विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी काम करुया. जागरूक नागरीक म्हणून काम करुया. कोरोनाची लक्षणे, जसे ताप, डोकेदुखी,खोकला असेल तर तत्काळ रुग्णालयात दाखल व्हा. आवश्यक तेवढा आराम करा. घरी थांबा.जेणेकरून इतरांना समाजात त्याची लागण होणार नाही.असे मतं हि त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

महाविकास आघाडी सरकारने याबाबत काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. गर्दी टाळण्यासाठी काही ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवस धार्मिक स्थळे, घरगुती कार्यक्रमांना जाणे टाळा. ज्येष्ठ, लहान मुले यांची विशेष काळजी घ्या.”ते म्हणाले, “आपण व्यक्तिगत जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे. या संकटात सारेजण एकजुटीचे सामोरे गेले पाहिजे. हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.” असे मतं हि त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

सांगली जिल्ह्यातील  ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

कोरोनासंबंधीच्या या बातम्याही वाचा –

करोनामुळं सोने बाजारावर संक्रांत; ७५ टक्के मागणी घटली

करोनानं रस्त्यावर थुंकणं केलं महाग; भरावा लागणार १००० रुपये दंड

कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद

दक्षता! केवळ १ रुपयात थर्मल स्क्रिनिंगद्वारे करा तापाची चाचणी

राज्यातील मास्कच्या वाढत्या मागणीवर मंत्र्यांनी ‘असा’ काढला मार्ग