सांगली प्रतिनिधी | कॉंग्रेसचे दिवंगत नेते पंतगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम भाजप मध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. लोकसभेच्या धककादायक निकाला नंतर कॉंग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजप सोबत संपर्क वाढवला आहे. अशा अवस्थेत विश्वजीत कदम यांच्या देखील भाजप प्रवेशाच्या चर्चेला उत आला आहे.
कोल्हापुरात राष्ट्रवादीला धक्का ; धनंजय महाडिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगू लागल्यानंतर विश्वजीत कदम यांनी स्व:ता या बाबत स्पष्टीकरण दिले आहे. आपण भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. कॉंग्रेसच्या विचारसरणीशी आपली बांधिलकी असून आपण पक्ष सोडणार नाही असे स्पष्टीकरण विश्वजीत कदम यांनी दिले आहे.
मोहिते पाटलांच्या अकलूजमध्ये भाजपला पडली एवढी मते
पुलूस कडेगाव मतदारसंघात विश्वजीत कदम यांचा सामना सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याशी होण्याची शक्यता आहे. देशमुख आणि कदम परिवारात या आधी देखील राजकीय मुष्ठीयुद्ध झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. यावेळी मात्र भाजपचे संग्रामसिंह देशमुख हे विश्वजीत कदमांना पराभवाची धूळ चारणार अशी सध्या या मतदारसंघात चर्चा सुरु आहे. त्यामुळे आपली आमदारकी कायम राखण्यासाठी विश्वजीत कदम यांनी भाजप प्रवेशा संदर्भात चाचपणी केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.