महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार का दुर्लक्ष करते?? – मंत्री विश्वजित कदम यांचा केंद्राला सवाल

Vishwajeet Kadam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे कृषी व न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी कोरोना आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या बाबतीत आढावा बैठक घेतली. राज्यातील शेतकऱ्यांचं परतीच्या पावसाने मोठं नुकसान झालं असून, शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याच्या सोबत आहे.पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार  का दुर्लक्ष करते?, असा सवाल मंत्री विश्वजित कदम यांनी केंद्र सरकारला केला.

शासनाकडे पैसे नसताना आणि केंद्र सरकार जीएसटीचे पैसे देत नसताना सरकार 10 हजार कोटी रुपयांची मदत देत आहे. सदर मदत महिन्याभरात शासन शेतकऱ्यांना देईल. बिहार राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे केंद्र सरकार त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करते. मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळे आहे का?, असा सवाल विश्वजित कदम यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

उद्धवजींनी शरद पवार यांच्याकडेच सगळे अधिकार सोपवले असल्याची टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती. त्याचाही त्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. चंद्रकांतदादांना फारसं गांभीर्याने घ्यायची मला गरज वाटत नाही. कारण महाविकास आघाडी सरकार आणि तीन ही पक्ष चांगलं काम करीत आहेत. आम्ही सत्तेवर आल्याबरोबर 98 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आमचं सगळं काही सुरळीत चालू असल्याचा दावा ही विश्वजित कदम यांनी यावेळी व्यक्त केलाय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’