हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज विश्वकर्मा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून येत्या 17 सप्टेंबरपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी घोषणा केली होती. त्यानंतर आज लगेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही योजना लागू झाल्याची माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत लघुउद्योग करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यामध्ये सोनार, लोहार, न्हावी आणि चर्मकार यासारख्या पारंपारिक कौशल्य असणाऱ्या लोकांचा समावेश असेल. या योजने अंतर्गत पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या लघुउद्योजकांना एक लाखांपर्यंत कर्ज देण्यात येईल.
विश्वकर्मा योजनेअंतर्गत, कारागीर आणि कारागीर यांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा सुधारणे, देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर या उत्पादनांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणे अशा गोष्टींवर भर दिला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये विश्वकर्मा या योजनेचा उल्लेख केला होता. त्यानंतर आज ही योजना लगेच जाहीर करण्यात आली आहे. येत्या 17 सप्टेंबरपासून ही योजना अमलात आणली जाणार आहे. या योजनेचा लाभ अनेक पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना होणार आहे.
विश्वकर्मा योजना काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या विश्वकर्मा योजनेला मंजुरी मिळाली आहे. ही योजना विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी अमलात आणली जाईल. या योजनेअंतर्गत सरकार पारंपारिक कौशल्य जपणाऱ्या लघुउद्योजकांना मदत करणार आहे. सोनार, लोहार, न्हावी आणि चर्मकार अशा सर्व लोकांचा समावेश असेल. त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला बळ देण्यासाठी सरकार उद्योजकांना एक लाखापर्यंतची मदत करेल. तसेच, तसेच त्यांना आपला व्यवसाय जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देखील सरकारकडून प्रोत्साहन करण्यात येईल. सुरुवातीला या योजनेसाठी पंधरा हजार कोटींची तरतूद आखण्यात आली आहे. पुढे याची रक्कम वाढविण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे, या योजनेअंतर्गत दरवर्षी 15 हजारपेक्षा जास्त लोकांना नवीन रोजगार मिळणार आहे.