सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
काही दिवसापूर्वी वावरहिरे सोसायटीची निवडणूक पार पडली आणि विकास आघाडीच्या गटाला धक्का देत आमदार गटाने वावरहिरेमध्ये आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. विरोधी गटाला १३/० च्या फरकाने येताना धक्का देताना आमदार गट विजय ठरला होता.
यानंतर बहुप्रतिक्षित वावरहिरे गावच्या सोसायटीच्या चेअरमन पदाची निवड बाकी होती. आता ती प्रतीक्षा संपुष्टात येऊन वावरहिरे गावाच्या सोसायटीच्या चेअरमन पदी प्रशासकीय कामाचा अनुभव असलेली व्यक्ती विश्वास पांढरे यांची निवड करण्यात आली, तसेच व्हाईस चेअरमन पदी तानाजी साळुंखे यांची निवड करण्यात आली.
प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेली व्यक्ती सोसायटीच्या चेअरमनपदी विराजमान झाल्यानंतर गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे,कारण पंचायत समितीमध्ये काम करत असताना विविध योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या त्यांनी राबवल्या होत्या ,त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला होता ,त्यामुळे सोसायटीच्या माध्यमातून ही शेतकरी विकासाचे निर्णय घेतले जातील असा विश्वास शेतकऱ्यांना आहे ,त्यामुळे चेअरमनपदी विश्वास पांढरे यांची झालेली निवड सार्थ असल्याचे सूर लोकांमधून उमटत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या निवडीबद्दल विश्वास पांढरे तसेच तानाजी साळुंखे यांचे आमदार गोरे,सभापती रंजना जगदाळे,वावरहिरे गावचे सरपंच चंद्रकांत वाघ,बाबासाहेब हुलगे, हरीभाऊ जगदाळे, रमेश कदम, आदींनी या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.