शिवसेना- राष्ट्रवादीची मते एकत्र केली तरी नोटापेक्षा कमीच; फडणवीसांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला दमदार विजय मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते एकत्र केली तरी नोटांपेक्षा कमी आहेत असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसामाध्यमांशी संवाद साधताना म्हंटल की , गोव्यातील भाजपच्या यशाचे श्रेय हे यथील जनतेचे तसेच पंतप्रधान मोदींचे आहेत. मोदींनी देशात जो विश्वास तयार केलाय त्यामुळे गोव्यात ही मतं मिळाली आहेत. मागील वेळेपेक्षाही जास्त मतं आम्ही मिळवले आहेत. याचा अर्थ असा आहे की आम्ही केवळ कोणत्या मत विभागणीवरून आलेलो नाहीत. सकरात्मक मतांवर निवडून आलो आहोत.

मी यापूर्वीच म्हणालो होतो कि गोव्यात शिवसेनेची लढाई हि आमच्याशी नव्हे तर नोटांशी आहे. आणि आज आपण बघितलं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची दोघांची मते जरी एकत्र केली तरी नोटांपेक्षा कमी आहेत असे म्हणत त्यांनी टोला लगावला. दरम्यान उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाला याचा काय आम्हाला आनंद नाही कारण शेवटी ते आमच्याच परिवारातील आहेत असेही फडणवीस यांनी म्हंटल

Leave a Comment